चित्र आणि कविता – बहुरंगी-बहुढंगी, वेगवगळी पण एकाच वेलीवर फुलणारी दोन फुलं. दोन्हींची
नाळ जन्मापासूनच आपल्याशी जोडली जाते. जगनिर्मात्याने काढलेल्या असंख्य, विविध चित्रांपैकी
एक आपण, आई नावाच्या कवितेपासून आपल्या आयुष्याची सुरवात करतो.पुढं मग कुणी चित्रकार
आपल्या कुंतलांतून, तर कुणी कवी शब्दा-शब्दांतून स्वतःच्या मनातलं भावविश्व साकारतो.
आणि या दोन्हींच्या सुगम समागमातून साकारते ती चित्रकविता.
चित्रकविता डॉट कॉम हा एक
प्रामाणिक प्रयत्न या चित्रमधूर कवितांना तुमच्यापर्यंत आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचविण्याचा.